भिंगाचे बिंग!
मुग्धा कंटाळली होती.आयुष्यालाच..तिला वाटे
काहीच कसे माझ्या मनाप्रमाणे होत
नाही?
असे काय घडले होते की तिने संपूर्ण आयुष्यालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करावे?
तसं बघायला गेलं तर तिचं आयुष्य इतर चारचौघीं सारखंच होतं.
चौकोनी,सुरक्षित कुटुंबाची चौकट भोवती. चांगल्या पगाराची नोकरी हातात. तब्येतपण ठणठणीत..
मग कंटाळा येण्यासारखे काय होते? तर तिच्या जवळच्या लोकांच्या मते तिला 'सुख' दुखत होते!!
ती समाधानी नव्हती. दिसायला गोड चेहऱ्यावर सदा सर्वकाळ चिंता वसत असे..आणि ती नेमकी कशाबद्दल तर तिच्याकडे त्यासाठी एक नाही तर दहा कारणे असत.
'आज दिवसभर लाईट गेले' ही गोष्ट तिच्यासाठी जणू आता तिला महिनाभर बिना लाईटचे काढावे लागणार आहेत की काय ..इतकी मोठी असे!
तिच्याशी संबंधित असलेल्या मोजक्या व्यक्ती सोडल्या तर तिचे कोणाशीही जमत नसे. सगळे लोकं अत्यंत स्वार्थी असतात आणि आपले काम संपले की पुन्हा आपल्याकडे ढुंकूनदेखील बघत नाहीत याबद्दल तिला इतकी खात्री होती की ती लोकांशी वागतांना सतत सावध असे. नाहीतर पावलोपावली आपल्याला कोणी फसवेल आणि आपले प्रचंड नुकसान होईल,असे वाटे तिला.
लोकं किती फालतू गप्पा मारत,बारीकसारीक जोक ऐकवत हसू शकतात याचं वैषम्य वाटे तिला.
एखादा जोक झाला तर यात काय हसायचं? असं वाटून तिच्या चेहऱ्यावरची रेष पण बदलत नसे.
अशी सदासर्वकाळ 'याक्कू क्रूरसिंग' अंगात घुसलेली व्यक्ती आपल्या सहवासात कोणाला आवडेल?
मग बहुतेक वेळा लोक तिला टाळत.कोणालाच तिचा सहवास मनापासून आवडत नसे.घरातल्या लोकांचा तर नाईलाज असे..
आणि एखाद्याला सतत समजून सांगायला मर्यादा असते..त्यापेक्षा समोरची व्यक्ती बदलत नाही असे लक्षात आल्यावर तिच्याकडे दुर्लक्ष करणे हा सगळ्यांचाच त्रास कमी करणारा पर्याय अशावेळी शक्यतो इतरांकडून निवडला जातो.
आपल्याच वागण्याने मुग्धा आयुष्यात एकटी पडली होती.
नकार, नकोसेपण, नाखुषी आणि नाराजी अशी 'न' ची नकारघंटा तिचं आणि घरातल्या इतरांचेही आयुष्य नकारात्मक बनवत होती.
कोणताही मोठा शारीरिक आणि मानसिक आजार नसतांना तिच्या शरीराचे आणि मनाचे स्वास्थ पार बिघडले होते.
तिच्याशी बोलतांना सगळ्यात प्रथम जाणवले ते हे की मुग्धा आपल्या स्वतःच्या आणि इतरांच्या वागण्याकडे 'Magnifying Len's' मधून बघत होती.
त्यामुळे साधे असणारे प्रसंग तिला कितीतरी पट मोठे 'दिसत' होते.
आपल्याला गाडीच्या बाजूला असलेल्या आरशात मागची गाडी जशी आपल्याला खूप जवळ दिसते..तसे!
त्यामुळे घडणाऱ्या प्रसंगांना आणि त्यातल्या व्यक्तींसाठी ती वापरत असलेले शब्द देखील 'प्रचंड त्रास' 'सहन करणे अशक्य' 'खूप खूप मनस्ताप,' 'दडपण वाढले' 'जगापासून दूर जायला पाहिजे' असे होते!
एखादी मुंगी जरी आपण जाड भिंगातून बघितली तर ती मुंगळ्या एवढी मोठी दिसणार आहेच.
'मला त्रास होतो' आणि 'मला ‘प्रचंड’ त्रास होतो आहे' या दोन वाक्यांमध्ये फक्त 'तीव्रतेचा'फरक नाही तीव्रता 'जाणवण्याचा' मोठा फरक आहे!

आयुष्यात कधीतरी आपल्याला आवडणार नाही असे प्रसंग घडतात. त्यांचा त्रास देखील होतो. 'मला कुठल्याही गोष्टीचा त्रासच होऊ नये' हेदेखील वास्तवाला धरून नाही.
एखादा त्रास हा फक्त 'त्रास' असतो..तो 'थोडा', 'प्रचंड', 'सह्य', 'असह्य', 'अशक्य', 'शक्य' 'सहनशक्तीच्या बाहेर', 'सहन करण्याजोगा'....हे सगळे त्या परिस्थितीवर नाही,तर परिस्थितीला सामोरे जाणाऱ्या व्यक्तींवर अवलंबून असते.
आपण आपल्याला जाणवणाऱ्या भावना कोणत्या शब्दात स्वतःशी बोलतो किंवा इतरांजवळ व्यक्त करतो..तुम्ही देखील विचार करून बघा.
म्हणून काही व्यक्ती कितीही मोठ्या संकटाला हसतखेळत सामोऱ्या जातांना आपण बघतो आणि काही व्यक्ती थोड्या त्रासाला देखील सगळं गाव गोळा करतांना बघतो.
आपल्या कितीही प्रेमाची आणि जवळची व्यक्ती असेल तर तिलाही तिच्या वागण्याकडे असे सतत भिंगातून बघितलेले आणि टीका करत बोललेले आवडणार नाही.
लहान मुलांनादेखील कायम अक्कल शिकवलेले आवडत नाही. ते लगेच उलटं बोलून दाखवतात, हा अनुभव नवीन नाही.
मुग्धाला आलेल्या काही अनुभवांवरून तिने 'सगळे’ लोक सारखेच..आणि ‘स्वार्थी' असतात हा काढलेला निष्कर्ष केवळ आततायी आहे आणि जवळच्या लोकांवर अन्याय करणारा देखील.
असं दार घट्ट बंद करून घेऊन स्वतःला सुरक्षित ठेवणं माणसाला एकटेपणाकडे घेऊन जातं.
आपल्या आजूबाजूला वेगवेगळ्या स्वभावाची आणि मनोवृत्तीची माणसे असतात. सगळ्यांचेच स्वभाव आणि व्यक्तिमत्व आपल्याला आवडेल असे नसते..
काही व्यक्ती ‘स्वार्थी’ वागतील तर काही ‘मदत’ देखील करतील. या मदत करणाऱ्या व्यक्तींना मात्र हक्काने गृहीत धरायचं आणि एखादा आपल्याशी स्वार्थीपणे वागला तर त्या अनुभवावरून सगळ्या जगाला नावं ठेवायची ..हे गुलाबाच्या फुलाकडे लक्ष जाण्याआधी, त्याचा वास,रंग बघण्याआधी केवळ त्याला किती काटे आहेत याकडे लक्ष जाणं आहे!
आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात रोज एक गोष्ट नव्याने घडते.
प्रत्येकासाठी रोजचा नवा दिवस एक सुंदर गिफ्ट बनून येतो..कोणालाही माहीत नसते त्यातले क्षण कसे उलगडणार आहेत..त्यात आपल्यासाठी काय काय ‘खजिना’ आहे!
रोज रात्री झोपतो त्यावेळी आपण स्वतःला संपूर्ण विसरून गेलेलो असतो..आपल्या भूमिका, नाती, इतकेच काय आपले नाव आणि अस्तित्व देखील जाणवत नाही आपल्याला. ‘गाढ झोप’ हे खरोखर एक वरदान आहे आपल्यासाठी.
आणि आपण असे करंटे की रोज भूतकाळातले भावनिक ओझे हट्टाने मनावर घेऊन नव्या दिवसाचे स्वागत करतो.
मुग्धा हेच तर करत होती..संपूर्ण काळ्या जाड भिंगाच्या चष्म्यातून जगाकडे बघत होती म्हणून या चष्म्यातून तिला येणारा नवीन रंगीत दिसतच नव्हता..त्यातला काळा रंग फक्त उठून दिसे.
शिवाय ती तो चष्मा हट्टाने आणि दुराग्रहाने आपल्या जवळ घट्ट बाळगून होती..त्या तुरुंगात तिने स्वतःला अडकवून घेतले होते आणि मग कंटाळा आला तरी तोच नैसर्गिक आहे असे समजून ती तेचते आयुष्य जगत होती.
महाभारतातल्या कर्णाने देखील आपली कवच कुंडलं क्षणार्धात दान केली पण मुग्धाला या आपल्या कवच कुंडलांपासून मुक्त होण्यासाठी फार प्रयास लागले.
पण ज्या क्षणी तिने ते खरोखर बाजूला केले त्या क्षणी तिला आपल्या आजूबाजूचे हेच जग आणि स्वतःचे आयुष्यदेखील किती रंगीबेरंगी आहे हे तिला समजले.
तिच्या कपाळावर मुक्काम ठोकून असलेली आठी पहिल्यांदाच स्वच्छ मोकळी झालेली सगळ्यांना जाणवली..
किती छोटीशी गोष्ट असते आणि त्यात आपण आपल्या आयुष्याचे किती दिवस वाया घालवतो..असे आता तिला वाटते..
कारावासातून मुग्धा तर मुक्त झाली...
आपले काय?
जरूर विचार करा..
आणि भिंगाचा जाड काळा चष्मा आपल्याही नकळत आपल्या डोळ्यांवर कधीतरी लावला जात असेल तर तो बाजूला करून स्वच्छ, उघड्या जाणिवेने अनुभवांना सामोरे जा!
आयुष्य,आपलं जगणं खरंच खूप सुंदर आहे!!
© डॉ. अंजली/अनन्या.
# आरसा
mindmatteraa@gmail.com
(फोटो सौजन्य: गूगल)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा