शनिवार, ८ नोव्हेंबर, २०१४

गंध वेड



गंधवेड्या चेतनेचे
हळू उमलावे अंतरंग अन्
खोल श्वासात माझ्या
मोहोळ सुखाचे जागावे    


पाकळीने उलगडावे
तलम धुक्याच्या पहाटे
मऊमोकळे सावरीचे  
बंध मनाचे हे व्हावे 

उमलावे हलके हलके
मधू गंधित माखावे  
गुज मनीचे ओळखता 
मौन व्हावे लाजरे 



रंध्रात प्राण अवघे
झाले बघ गोळा रे 
पेशीत निळेजांभळे
अधीर आभाळ उमटावे

विरघळावे द्वैत असे
प्राण प्राणात मिस
ळावे 
मी न उरावे माझ्यासाठी
अवकाश तुझेही मी व्हावे. 


-अनन्या.