तेज व्यापले घन निळे
दशदिशांतून धावत आले
मनसंमोहन गूढ असे
वेग भरारा अल्लड वारा
छेड काढतो उगीच अवखळ
रेशीम रेशीम तळस्पर्शाला
वेल बिलगली तरूस अलगद
रंग मंजिरी हिरवी जादू
गर्द केशरी उन्हात झिलमील
पानोपानी गार शहारा
नुपूर नाजूक रुणझुण किलबिल
आर्त असोशी झुकली खाली
अवनीने उंचावले मस्तक
क्षितिजतळाशी लाल गुलाबी
देहबावरी लाजरी कुजबूज.
-अनन्या
मनसंमोहन मनापासून आवडली, शेवटचं कडवं तर जास्तीच भावलं......शुभेच्छा!!!
उत्तर द्याहटवाएक सकारात्मक उर्जा आहे प्रतिक्रिया म्हणजे..
उत्तर द्याहटवाधन्यवाद अक्षय!
Far sundar ahet kavita.
उत्तर द्याहटवाAnanyaaji lihit raha.
Aajkal changla lihinare lok kami ahet.
आपल्या कविता कोणी वाचतंय आणि त्यांना त्या आवडताहेत अशी प्रतिक्रिया उत्साह वाढवणारी असते निश्चित,
हटवाधन्यवाद!
-अनन्या
Far sundar
उत्तर द्याहटवा