रविवार, ६ जुलै, २०१४

चौकट



सुबक नक्षीदार
चौकट माझी
सुख ओसंडे
कणाकणातून

चित्त सुखावे
वृत्ती फुलल्या
हळूच काही
लपले आड. 

सांदी कोपरे
नितळ नीरामय
वेध घेतला
सारे सुस्थीर..

शोध शोधले
पुन्हा पुन्हा मी
आतून त्वरेने
निसटले काही.

सुखातले कण
सुखातले क्षण
चौकट नक्षी
हळू ओलांडून,

पडले बाहेर
कळले नंतर
सुखात गुदमरले
माझेच अंतर.

-अनन्या

1 टिप्पणी: