शनिवार, ३ मे, २०१४

स्पर्श



खरा खराच वाटतो
क्षण सुखाचा स्पर्श असा
क्षणभरातच संपतो   
मागे उरतो केवळ, 
आठववर्ख फसवा  

नश्वर अवघी स्पंदने तरी    
लागले हवे हवे चे पिसे
जाळ्यातून सुटतांनाही
श्वास मागेच खेचतो    

वर्तमान स्त्रवतो अविरत
अटळ जाणिवांचा आवेग  
एकरूप शरीरांचा
आलेख मार्ग शोधतो.

गाढ गहिऱ्या वासनेचे
रुजते ऋण ओळखीचे
स्पर्श चैतन्याचा पेशीत
कोण जागतो, जागवितो?

-अनन्या



६ टिप्पण्या:

  1. वाट..
    ही पोस्ट छान होती. वेगळी वाट केव्हातरी चालायला हवीच.
    ती वाट चोखाळणं सर्वार्थाने आपल्याला काहीतरी हमखास देऊन जातं.
    मधे एक असे वाचले की, आजवर जे मिळाले नसेल ते मिळवायचे असेल तर आजवर न केलेली कृती तुम्हाला करावी लागेल.
    इसी बात पर एक शेर..
    क्यों डरें जिंदगीमें क्या होगा?
    कुछ न होगा तो तजुर्बा होगा...

    स्पर्श...
    फार छान मांडणी आहे.
    क्षणभरात संपतो, आठववर्ख फसवा, एकरूप शरीरांचा आलेख, गाढ गहिरी वासना..या प्रतिमा प्रणयरम्य, आकर्षक आहेत.
    स्पर्शांच्या घाटावरून तुम्ही अगदी हलके हलके एक अपुरेपण जागे ठेवून वावरलेल्या आहात.

    उत्तर द्याहटवा
  2. खरंतर लिहिणं हे देखील अशाच कुठल्यातरी क्षणाचं देणं असतं.
    फांदीला पान उगवावं इतकं सहज असतं मनात शब्दांचं उमलणं!
    हे शब्द दुसऱ्याच्या अनुभवविश्वाशी सुद्धा सहज संवादी होऊ शकतात का असा विचार मनात येतो खरा.
    आपली प्रतिक्रिया याचं उत्तर देणारी आहे, धन्यवाद!

    उत्तर द्याहटवा
  3. स्वरः जगजीतसिंग..शायर- बहुधा फैज...

    उत्तर द्याहटवा
  4. जगजीतसिंग यांच्या आवाजातील एक खूप सुंदर नज्म, जावेद अख्तर यांची!
    हंसती आँखों में झांककर देखो
    कोई आंसू कहीं छुपा होगा...

    उत्तर द्याहटवा
  5. मोहतरमा अनन्या...
    जगजीतसिंग, नज्म, जावेद अख्तर ..इस माहौलमें अगर आप हमें न ले जाए तो बेहतर..
    एक बार गए तो कदम वापस आनेका नाम नही लेते..

    उत्तर द्याहटवा