अंगोपांगी हळद लेवून
सोनसकाळी ऊन कोवळे
खुलले कांचन अजूनच थोडे
फांदी फांदी झुकली खाली
फुले हळदुल्या रंगात न्हाली
हिरव्या हिरव्या देठात
नव्याने
लहर अनावर धावत आली.
मत्त सुखाची लाट चहूकडे
रंगबावरे माझेही मन
अंगोपांगी फुलता कोणी
खुणावते मज वेडे होऊन
असे खुलावे, असे फुलावे
देहाचे अवघे भान हरावे
रंध्रात उमटले फुलणे, झुलणे
वेड
तयाचे मला लागले!
-अनन्या
khup chhan..! sundarr !
उत्तर द्याहटवाधन्यवाद!
हटवाDivas tujhe he phulayche, bahava,
उत्तर द्याहटवाjhopalya vachun jhulayche..
कविता खूप सुंदर आहे
उत्तर द्याहटवा