अशाच धूसर होत जातात
पावला खालच्या रुळलेल्या वाटा
आपलीच सावली वाटावी अनोळखी
इतके बदलून जातो आपणही.
निसटते मुठीतून वाळू नकळत
कमी होतात श्वास तसे
जगण्याचे सगळेच बहाणे
वाटेवरच्या पावलांपुरते..
मागे वळून बघता बघता
पुन्हा पुन्हा हे जाणवते
कोणीतरी आत जागे
बोलते सतत, जोडते नाते,
दूर निघून येतो तरीही
जगायचे राहूनच गेलेले असते
समोरचे क्षितीज खुणावते नव्याने
पावलांआधी मनच पुढे झेपावते….
-अनन्या.
मला गद्य प्रकारात जास्त रस आहे, पद्य प्रकाराशी माझे विशेष जुळले नाही कधी, पण हि कळली आणि आवडली पण!
उत्तर द्याहटवा