भरून आलय आभाळ अनावर
अन् वाटा अंधारलेल्या
जवळ असूनही तू, मी
एकाकी,
बोलायचंय कितीतरी
पण शब्द मुके मुके
वाट तुझी बघणारे
मन किती सुने, रिते
तरीही यावेस तू,
मिटल्या पापण्यांवर
ओठ टेकवावेस अलगद
अन् क्षणात मिटावे, आपल्यातले
नि:शब्द अंतर
...पण तू असा दूर
एकाच घरात,
वेगवेगळ्या जगात
कधी रे झालो आपण
दोघे
असे ओळखीचे अनोळखी?
सगळं असूनही सुबक,
मुलायम
काहीतरी खुपते आहे
हळूहळू आतल्या आत जमीन
पावलाखाली खचते
आहे...!
-अनन्या
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा