मंगळवार, १७ फेब्रुवारी, २०१५

प्राजक्त

अनावृत्त थेट जगण्याला भिडताना    
photo source internet
ओघळलेले घाम अश्रू
बंद ओठाआड सारतांना
अनुभवाच्या आकाशात
स्वच्छंद भिरभिरणारं
स्वप्नवेडं मन
क्षणांच्या कुपीतून
अलगद शोषून घेतं
मकरंद स्वत:साठी..

आपल्या भिरभिरत्या पंखांनी
आकाश कवेत घेता घेता
घाम आणि अश्रूंची
कधी चांदणस्पर्शी फुलं होतात
आणि मनाच्या अंगणात
त्यांचाच प्राजक्त बहरतो रोज सकाळी!  

-अनन्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा