बदलत्या काळात
स्वप्नं बदलली, आकांक्षा बदलल्या
नवी घरटी बांधून
पिल्ले दूर राहायला गेली
काचेच्या खिडक्या आल्या
तरी नाती मात्र अपारदर्शकच!
बदलत्या काळात
घरं बदलली, घरपण बदलले
नव्या परीघांसोबत
कुटुंबाची व्याख्या बदलली
हव्या हव्याशा वाटणाऱ्या क्षणांची
दाणे टिपणाऱ्या काबुतरांसारखी
अवस्था झाली!
बदलत्या काळात
माणसं बदलली, भावना बदलल्या
अंतराची परिमाणं बदलली
भूतकाळाची पीसे अलगद
काळजाच्या वहीत
दडवून ठेवली!
तरीपण एक विचार येतो,
आपली गरज आपलेपणाची..
उत्तरंही आपल्याकडेच
प्रश्न कितीही पडले तरी!
-अनन्या
Khup Chan
उत्तर द्याहटवाधन्यवाद विजयजी!
हटवाKharach prash kitihi pdle tari apli uttara aplyakadech!!!' khup chhan kavita
उत्तर द्याहटवाHavyahavyasha kshananchi avastha dane tipnarya kabutarasarkhi zali"
उत्तर द्याहटवाKay chaan lihilet tumhi ananyaa.
Ekdam khare ani pramanik shabd ahet tumche.
भावना आणि Anonymous आपण दिलेला प्रतिसाद आवडला.
हटवाआभारी आहे.
balalela kal tumchya kavitet samavla ahe..... keep it up.....
उत्तर द्याहटवाvisit tanvik786.blogspot.in
badalela kal tumcya kavitet samavela ahe..... ati sundar mandani......
उत्तर द्याहटवाvisit tanvik786.blogspot.in
धन्यवाद तेजल!
उत्तर द्याहटवाआपला ब्लॉग जरूर बघेन.
chan! avadali
उत्तर द्याहटवा