जिथे विश्वास आहे
तिथे जरूर वाकावे
मोठेपणाचा ‘आब’ जिथे,
मान आपोआप झुकते.
वृत्ती ज्याची संत,
तो आहे साधू
शुभ्र, विरागी वस्त्राआड आहे,
केवळ संधिसाधू.
पावलोपावली फुलले आहेत
साधकांचे मळे
साध्य,साधन भलतीकडेच
ढोंगाची पाळेमुळे.
वय केवळ मोठे यांचे
म्हणून वाकायची गरज नाही
कर्म मोठे ज्याचे त्याला
असल्या सोपस्कारांची तमा नाही.
मंदिर,मस्जिद, गीरीजाघरात
गर्दीच केवळ, देव नाही
माणसाआतल्या माणूसकीला
देवत्वाची झूल नाही.
भाव ज्याच्या मनी त्याच्या
वागण्या बोलण्यात देव आहे,
सत्य ज्याच्या मुखी त्याच्या
पावला पावलात विश्व नवे.
-अनन्या.
Mastach ahe hi kavita.
उत्तर द्याहटवाChautha kadva ekdam bhari!
Adhichi kavita pan avadli.
Tyalahi sasri yeun baghu de kalpana mast.
धन्यवाद!
हटवासुंदरच आहे ही कविता. तुझा असा वेगळाच दृष्टीकोन आहे प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा. सगळ्या कवितांमध्ये जाणवतो तो.
उत्तर द्याहटवाकथा,ललित असंही काही लिहितेस का?
मानसी.
'माणसाआतल्या माणुसकीला देवत्वाची झूल नाही'.. फार आवडलं.
उत्तर द्याहटवामानसी, अक्षय धन्यवाद!
हटवामनात विचार खूप असतात. कसे मांडावेत कळत नाही.
कविता सहज उमटते. ललित ही लिहिते पण अजून ब्लॉग वर नाही आणलं.
Khup chhan.. vastav.. Katusaty
उत्तर द्याहटवा