शुक्रवार, ६ जून, २०१४

आभास


आभास केवळ जीवन म्हणजे
रंगात रंगल्या भावनांचा
दिवस सरता, रंग उतरतो..       
रित्या मनात रंगहीन प्रतिमा

इथे कुणाचा नसतो कोणी,
वाट पाहतो केवळ आपण
सुखात रमते सोबत गर्दी,
दु:खात मोकळे हातच सांत्वन    

मार्ग असतो सदैव एकटा,
साथ कोणाला कुणी द्यायची
सहजीवनाची स्वप्नील नाती,
औटघटकेचे सखे सोबती

अंती उरते पोकळ परके
माझ्यातले मी पण ही पोरके
जन्मबंध उसवत जाता जाता
या खेळाशी तुटते नाते!

तुटते नाते!

-अनन्या
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा