Tuesday, 10 February 2015

पहाट

आभास सारे दाटलेले                                 
धुक्यात हरवली वाट अशी                     
अडखळले पाऊल जरासे
नजर बावरली जराशी

कठीण किती जरी चालणे
तरी पुढेच जाणे आहे अविरत  
परतून मागे फिरण्यासाठी
भवताल अधांतरी अनंत केवळ

संपत नसते कधीच काही
शेवट तो नसतो कधीच..
अवघड असते वळण इतकेच,
अशक्य नसते कधीच काही

काळोखगहिरी रात्र हलके
विरघळते, विरळ होते धूके
क्षितीजतळाशी पहाट नवेली  
ओठंगून उभी असते! 
-अनन्या

2 comments: